Nashik News : नाशिक हादरले! दारुसाठी ५०० रूपये घेतले, जन्मदात्याने पोटच्या गोळ्याला संपवले, घटनेने खळबळ


Nashik News : भाच्याने केलेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. मारहाणीमध्ये मृत तरुणाचा वडिलांचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नाशिक रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. या घटनेने नाशिक हादरले आहे.

सुनील सूर्यवंशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वडिलांसह भाच्याने केलेल्या मारहाणीत सुनीलचा जीव गेला असल्याची माहिती नाशिक रोड पोलिसांनी दिली आहे. त्यांनी दोघांना बेड्याही ठोठावल्या आहेत.

नेमकं घडलं काय?

मध्यरात्री दारु पिऊन सुनील त्याचे वडील नानाजी सूर्यवंशी यांच्याशी तो भांडण करु लागला. भांडणात त्याचा भाचा नानाजींच्या बाजूने भांडू लागला. सुनीलने मद्यपान करण्यासाठी वडिलांकडे ५०० रुपये मागितले होते. पैसे देण्यास नकार दिल्याने सुनीलने मध्यरात्री धिंगाणा सुरु केला. Nashik News

पुढे भांडणात वडिलांना आणि भाच्याने त्याला मारहाण केली. बेदम मारहाणीत तो जखमी झाला. जखमी अवस्थेत असताना सुनीलला रुग्णालयात बाहेर ठेवून त्याचा भाचा पळून गेला. उपचार करण्यास विलंब झाल्याने सुनील सुर्यवंशीचा रुग्णालयाबाहेर मृत्यू झाला.

दरम्यान, ही बातमी कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. पुढे त्यांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुनीलचे वडील आणि त्याचा भाचा या दोघांना अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!