Nashik News : ललितचा एन्काऊंटर नका करू, आईची पोलिसांना विनंती, तर वडील म्हणाले, त्यांची चूक…

Nashik News नाशिक : ससून रुग्णालयातून गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. ललितच्या अटकेनंतर आता याप्रकरणी आणखी मोठी नावे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ललित पाटील याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचा एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे. Nashik News
ललित पाटीलची आई म्हणाली की, माझ्या मुलाचे एन्काऊंटर करू नका, त्याच्यामागे २ मुले आणि आई वडील आहेत. मला त्याचा एन्काऊंटर होईल अशी भीती वाटते. त्यामुळेअसे करू नका. Nashik News
पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली. ललित सापडला तर त्याचा एन्काऊंटर करू असं पोलिसांनी धमकी दिली होती. त्यामुळे मला भीती वाटते. ललितला फसवले आहे. जी शिक्षा असेल ती भोगावी असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच मुंबई पोलिसांना तपासात ललितने सहकार्य करावे. त्याला फसवून या मार्गाला टाकले गेले. त्याला टॉर्चर करण्यात येत होते. पैशांची मागणी होत होती. ललितचे ऑपरेशन होणार होते, म्हणून ससूनला दाखल केले असं आईने म्हटलं. तर माझी तब्येत बिघडली आहे. बीपी, सुगरचा त्रास आहे.
ललितला जन्म दिला हा आमचा गुन्हा आहे का? ३ वर्षापासून तो जेलमध्ये होता, आमची भेट नाही. पोलीस आम्हाला त्रास देतायेत. नातवांना तुमचे आयुष्य बर्बाद करू असं पोलीस म्हणतात. त्यांची चूक काय? ललितने तपास यंत्रणांना सहकार्य करावे. जे खरे असेल ते सांगावे असं त्यांच्या वडिलांनी म्हटले आहे.