Nashik Loksabha : मोठी बातमी! नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट, ‘या’ उमेदवाराने अचानक भरला शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज…


Nashik Loksabha : नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? याबाबत संभ्रम कायम असतानाच शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने अर्ज दाखल केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. Nashik Loksabha

शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती. त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल…

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नाही. मात्र शांतीगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!