मध्य रेल्वेच्या नूतन महाव्यवस्थापकपदी नरेश लालवानी यांची नियुक्ती…!


नवी दिल्ली :मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी पदभार स्वीकारला आहे. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेतील 1985 च्या परीक्षेच्या बॅचचे वरिष्ठ अधिकारी असून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांच्याकडे या पदाचा अतिरीक्त पदभार होता.

लालवानी यांनी 1985 मध्ये गोविंदराम सक्सेरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स,  इंदौर येथून पदवी संपादन केली आणि 2010 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर येथून व्यवसाय प्रशासनात कार्यकारी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. लालवानी यांना निर्माण आणि ओपन लाइन ऑपरेशन या दोन्हींचा व्यापक अनुभव आहे. तसेच त्यांनी चीन आणि फ्रान्समध्ये व्यवस्थापन प्रशिक्षण, ऑस्ट्रिया आणि इटलीमध्ये ट्रॅक मशीन प्रशिक्षण, अमेरिकेत नेतृत्व प्रशिक्षण आणि ऑस्ट्रियामध्ये दक्षता प्रशिक्षण घेतले आहे. भारतीय रेल्वेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा त्यांना समृद्ध अनुभव आहे.  आसाममधील लुमडिंग येथून कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी 10 वर्षे ईशान्य फ्रंटियर रेल्वेमध्ये काम केले.  यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेत अहमदाबाद आणि मुंबई विभागात विविध पदांवर काम केले.

लालवानी यांनी भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, पुणे येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे आणि रेल्वे अधिकाऱ्यांना ज्ञान दिले आहे.  ते करार आणि लवाद, संरक्षा आणि व्यवस्थापन विकास या क्षेत्रातील तज्ञ आहेत.  त्यांनी मध्य रेल्वेत मुख्य अभियंता (ट्रॅक मशिन्स),  तसेच दक्षिण रेल्वेतील पलक्कड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!