Narendra Modi : पुण्यातील मोदींच्या सभेचे ठिकाण बदललं? आता एसपी कॉलेज नाही तर…; महत्वाची माहिती आली पुढे…

Narendra Modi : पुण्यात २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, आता मोदींच्या प्रचारसभेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पुण्यामध्ये २९ एप्रिलला होणार आहे.

यासाठी शिरूर,बारामती, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी मध्यवर्ती अशा भागात ही सभा घेण्याचं नियोजन सुरू होतं. त्यात शहरातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
पण आता हे ठिकाण मोदींच्या सभेसाठी कमी पडण्याची शक्यता असल्याने हडपसर परिसरातील रेसकॉर्स येथे होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पुण्यातील एसपी.कॉलेज येथे ही सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. Narendra Modi

या सभेसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. एसपी.कॉलेज या ठिकाणी ४० हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. पण आता रेसकॉर्स येथे सभा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. बहुतांश सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या नेत्यांचे रोड शो, जाहीर सभा यांचे आयोजन केले जात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी टाकली आहे.