Narendra Modi : महाराष्ट्रातील अतृप्त आत्म्याने देश व राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण केली, ते दुसऱ्यांच्या स्वप्नात माती कालवतात! पुण्यात नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर हल्लाबोल..!!


Narendra Modi पुणे : देशात व राज्यात असे अतृप्त आत्मे आहेत. त्यांची स्वप्नं कधी पूर्ण होत नाही, तर ते दुसर्‍याच्या स्वप्नांत माती कालवतात. असाच एका बड्या नेत्याची महत्त्वाकांक्षा महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण करत आहे.त्यांनी घरातही अस्थिरता निर्माण केली. आता हा भटकता आत्मा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे

पुण्यातील रेसकार्स मैदानावर पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी महायुतीचे उमेदवारांसाठी सोमवारी (दि.29) झालेल्या जाहीर प्रचारसभेत मोदींनी शरद पवार यांच्या नाव न घेता राजकीय कृतीवर आक्रमक हल्ला चढविला आहे. असे ते बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, काही आत्मे भटकत राहतात. महाराष्ट्रात 45 वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याच्या महत्त्वाकांक्षेने या खेळाची सुरुवात झाली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरतेला प्रारंभ झाला. विरोधकांत राहूनही आत्मा काहीतरी करू पाहत आहे. तसेच, आता ते त्यांच्या परिवारातही करत आहे. राज्यात भाजप- शिवसेना युतीचे सरकार 1995 मध्ये आले, तेव्हाही त्यांनी अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.

राज्यात 2019 मध्ये जनादेशाचा मोठा अपमान करत सत्ता स्थापन केली. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे. देशात, महाराष्ट्रात स्थिर सरकार निर्माण झाले पाहिजे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुढील 25 ते 30 वर्षे स्थिर सरकार झाले पाहिजे असे मोदी म्हणाले. Narendra Modi

सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी, डॉ. नीलम गोर्‍हे, माधुरी मिसाळ या वेळी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!