राज्यसभेत नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका, तर शरद पवारांचे केले कौतुक…!
नवी दिल्ली : दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून सध्या गौतम अदानी यांच्यावरून गोंधळ सुरू आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रसेवर कडाडून टीका केली.
यावेळी मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत मी त्यांना आदरनीय मानतो, १९८० मध्ये त्यांचे सरकार काँग्रेसने पाडले, असे सांगत काँग्रेसने अनेक राज्यांतील सरकारे कशी पाडली याची देखील अनके उदाहरणे दिली. यावेळी मोदी चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, इंदिरा गांधी यांनी ५० वेळा कलम ३५६ चा वापर केला. त्यांनी ५० वेळा विविध राज्यांतील सरकारे पाडली. डाव्या पक्षाचे सरकार सर्वात आधी केरळमध्ये स्थापन झाले, पण नेहरूंना ते पसंत नव्हते काही दिवसांतच त्यांनी ते सरकार पाडले.
तसेच तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांचे देखील सरकार काँग्रेसने पाडले. या सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य मागे बसले आहेत. मी त्यांना आदरनीय मानतो, त्या नेत्याचे नाव शरद पवार, पवार तेव्हा तरुण असताना महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी निघाले होते, पण त्यांचे देखील सरकार काँग्रेसने पाडले.