Narendra Modi : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ट्रम्प यांचे अभिनंदन, म्हणाले, भारत-अमेरिका…
Narendra Modi : जागतिक महासत्ता अमेरिकेच्या चाव्या आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात गेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते चांगले मित्र आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केलं आहे.
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारत आहेत. यापूर्वी ट्रम्प २०१६ ला पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. ट्रम्प यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन.
तुमच्या मागील राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील यशाचा आधार घेत, मी भारत-यूएस व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी, तसेच सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
तसेच आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले आहे.