Narayan Rane : ..तर याला बाळासाहेबांनी गोळ्या घातल्या असत्या!! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंचे नाव घेत थेट हल्ला
Narayan Rane : उद्धव ठाकरे आवळत चालले आहेत, त्यांची ताकद काही नाही. आम्ही रिफायनरी करून दाखवणार, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नारायण राणे यांनी त्यांचे पूत्र आणि शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्यासाठी झालेल्या मेळाव्यात सहभाग नोंदवला.
या मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. आजची उपस्थिती पाहता निलेश राणे 100 टक्के विजयी होतील, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंची सभा झाली की माझी सभा असणार, अपशब्द बोलला की त्याला म्हणावं एकच रस्ता आहे. हेलिकॉप्टरने जाऊ नको, बाय रोड जाऊन दाखव, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. १३ तारखेला उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच महायुतीचे तीनही उमेदवार निवडून येतील, ४० हजारांच्या वर तिघांना मताधिक्य असेल, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. Narayan Rane
शिवसेना पक्षाचा प्रमुख बाळासाहेबांचा पूत्र एका सभेत म्हणतो सोसायटीमध्ये तुम्हाला बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल तर दिवाळीला कंदील उतरवा. मला बाळासाहेब आठवले, याला असं बोलल्यावर गोळ्या घातल्या असत्या. एवढे कडवट होते बाळासाहेब, असे नारायण राणे म्हणाले आहेत.