Narayan Rane : जरांगे-राणे वाद पेटला! नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखवं, नारायण राणेंचं मनोज जरांगेंना आव्हान…

Narayan Rane : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून चौथ्यांदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्यात येत आहे.

सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर भाजप नेते नारायण राणे चांगलेच संतापले आहेत. Narayan Rane
राणे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत मनोज जरांगे पाटील यांना थेट इशाराच दिला आहे. मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही, असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

नारायण राणे म्हणाले काय?
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली.
त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत!, असे ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय…
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 14, 2024
दरम्यान, नारायण राणे यांच्या या इशाऱ्यानंतर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आपलं उपोषण सुरूच ठेवलं असून त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती मराठा बांधव करीत आहेत.