सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं वक्त्यव्य ; “चुका होतात आणि झाल्या आहेत…!

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. तांबे प्रकरणात ‘एबी फॉर्म’चा काय घोळ झाला होता ? असा प्रश्न विचारल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खुलासा दिला असून, ते म्हणाले की चुका होतात आणि झाल्या आहेत.

पटोले म्हणाले , १० जानेवारी ला नागपूरला प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली होती. तेव्हा संघटना सचिवांना एबी फॉर्म देण्यास सांगितले होते. त्यानुसार फॉर्म देण्यात आला होता; पण तो नागपूरचा असल्याचे समोर आले. त्यानंतर दुस-या दिवशी ११ तारखेला बाळासाहेब थोरातांचे जवळील व्यक्ती मनोज शर्मांकडे दुसरा फॉर्म पोहचवण्यात आला होता.
ते पुढे म्हणाले, मग, सुधीर तांबेंनी उमेदवारी दाखल करायला हवी होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी सांगितले, सत्यजीत तांबेंचे नाव लिहले नसल्याने आम्ही अर्ज दाखल केला नाही. परंतु, ‘चुका होताच आणि झाल्या आहेत. वेळेवर दुरुस्त केल्यावर त्याला चुक म्हणत नाही. पण, हा कुटुंबाचा वाद आहे. कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये याची काळजी सर्वांना घेतली पाहिजे असा सल्ला नाना पटोलेंनी दिला आहे’.
