Nana Patole : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरली, केलं धक्कादायक वक्तव्य, हे स्वत:ला देव समजू लागलेत, पण…


Nana Patole : निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता जाहीर सभांमध्ये वक्तव्य करताना नेत्यांची जीभ घसरू लागली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाबाबत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे.

नाना पटोले यांनी अकोल्यात काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्यासाठी प्रचारार्थ सभा घेतली. या सभेला संबोधित करताना नाना पटोले यांची जीभ घसरली. अकोल्यातील आपल्या भाषणात ते म्हणाले, भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. आता या महाराष्ट्रातून भाजपला हटवण्याची वेळ आली आहे. आता सत्तेत आलेल्या या पक्षाला जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.

नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, लाल रंग हा हिंदू धर्मात पवित्र समजला जातो. पण, फडणवीस-भाजप यांचा संबंध नक्षलवादाशी जोडतात. एक नववधू लाल साडी नेसते, तिचा कुंकू लाल असतो. याचा अर्थ ती नक्षलवादी आहे का? कोणीतरी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा असेही पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी म्हटले की, भाजपवाले स्वतःला देव समजतात, त्यांची मस्ती वाढली आहे. दिल्लीतील लोक स्वतः ला विश्वगुरू मानतात. महाराष्ट्रात फडणवीस स्वतः ला देव मानतात. त्यामुळे त्यांच्या सत्तेचा माज उतरवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे टीका पटोले यांनी केली.

राहुल गांधी यांच्यावर भाजप खोटारडेपणा पसरवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. भाजपची विचारसरणी मनुस्मृतीतून निर्माण झाली आहे आणि काही निवडक लोकांनी राज्य करत राहण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!