Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात, भरधाव ट्रकने दिली मागून धडक…


Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. पघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवारी नाना पटोले हे आपला सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली आहे. तर नाना पटोले हे देखील थोडक्यात बचावले आहेत. Nana Patole Car Accident

या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पुढील अधिक तपास सुरू केलाय. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!