Nana Patekar : आगामी निवडणुकीत भाजप किती जागा जिंकणार? आता अभिनेता नाना पाटेकर यांनी सगळं गणित सांगितलं..

Nana Patekar : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या ‘ओले आले’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र सध्या नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांना विचारण्यात आले होते की आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांचे मत काय आहे? त्यावर ते म्हणाले की, देशासमोर भाजपशिवाय पर्याय नाही. Nana PateNana Patekarkar
त्यांच्या मते नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान होतील. त्यांचे शब्द होते: आगामी निवडणुकीत भाजपला ३५०-३७५ जागा मिळतील आणि भाजप पुन्हा सत्तेत येईल. असे त्यांनी वक्तव्य केले आहे.
ते पुढे म्हणाले, भाजप देशात चांगले काम करत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. देशासमोर भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही. नानांचं भाकित आता खरे ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.