राज्याच्या राज्यपालपदी ‘हे’ नाव निश्चित ; लवकरच घोषणा होण्याची शक्यता…!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यांनी अनेक बेताल वक्तव्य केली आहेत. यामुळे त्यांना लवकरच पदावरून हटवणार असल्याचे सांगितले जात आहे.
असे असताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह महाराष्ट्राचे यानंतरचे राज्यपाल होऊ शकतात. याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी अमरिंदर सिंह यांच्या नावावर सहमती दर्शवली असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॅप्टन सिंह यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते भाजपच्या बैठकांमध्ये उपस्थित राहत आहेत. आर्मीतून रिटायर्ड झालेले कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे.
भाजपने कॅप्टन सिंह यांना ८३ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी केले आहे. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल. मात्र यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.