दिल्लीत रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल, पोलिस निलंबित…


नवी दिल्ली : रस्त्याच्या बाजूला काही मुस्लिम युवक नमाज पठण करत असतांना काही पोलिसांनी या युवकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका पोलिसाने नमाज पठण करणा-या युवकाला लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीच्या इंद्रलोक परिसरातुन समोर आला आहे.

त्यानंतर येथे गर्दी जमा झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. हा व्हीडीओ त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर दिल्लीचे डीसीपी मनोज मीना यांनी संबंधित पोलिसाला निलंबित केले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी हा व्हीडीओ त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे.

ते म्हणाले, ‘‘हा पोलिस कर्मचारी माणुसकी विसरला असावा. पोलिसांच्या मनात असा कोणता द्वेष निर्माण झाला आहे? दिल्ली पोलिसांनी या पोलिस कर्मचा-यावर कारवाई करावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!