स्मशानभूमीत नग्न पूजा! काळी बाहुली अन् चिठ्ठीवर नाव, पुरुष आणि महिलेकडून कृत्य, भयंकर प्रकार आला समोर…

कोल्हापूर : कोल्हापुरात जादुटोण्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील उदगाव या गावातील स्मशानभूमीत भर दिवसा पुरुष आणि महिला नग्न अवस्थेत येऊन करणी व भानामती करत असल्याचे प्रकार झाले आहेत. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली. यामुळे यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
या घटनेनंतर कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचे समोर आले. यानंतर उदगाव ग्रामपंचायतकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलं.
याठिकाणी अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत.
त्यामुळे या भोंदूगिरीवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ही करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि गावकऱ्यांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सध्या तपास सुरु असून अजून कोणावर कारवाई केली गेली नाही.