Nagpur News : धक्कादायक! अमित शहा यांच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्याला कोटींचा गंडा, नागपुरमधील खळबळजनक घटना..


Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा वापर करून नागपुरातील एका व्यापाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.सीएसआर फंडाच्या नावाखाली या व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे.

मो गुलशाद बहना (वय.३८ रा. इंदोरा चौक) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे

मिळलेल्या माहिती नुसार, रोपींनी मो गुलशाद बहना यांना सीएसआर फंडाच्या नावाखाली गंडा घातला आहे. टाटा कंपनीतून ४६० कोटी रुपये सीएसआर मिळत असून, ४०० कोटी त्यांना कॅश परत करायचे आहेत, यात मदत केल्यास उर्वरित ६० कोटी रुपयांपैकी ३० कोटी रुपये तुम्हाला देऊ असं अश्वासन आरोपींनी या व्यापाऱ्याला दिलं होतं. हे सर्व आरोपी मुंबईमधील असल्याची माहिती समोर येत आहे.

आरोपींनी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा वापर केला. टाटा कंपनीतून ४६० कोटी रुपये सीएसआर मिळत असून, ४०० कोटी त्यांना कॅश परत करायचे आहेत, यात मदत केल्यास उर्वरित ६० कोटी रुपयांपैकी ३० कोटी रुपये तुम्हाला देऊ असं अश्वासन आरोपींनी व्यापारी मो गुलशाद बहना यांना दिले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांची वेगवेगळ्या व्यक्तींसोबत भेट करून दिली. Nagpur News

त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मो गुलशाद बहना यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात मुंबईतील आरोपी ॲलेक्स मिरांडा आणि त्याची पत्नी एंजल मिरांडा यांच्या विरोधात जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!