दहिवडी येथील चिमुकल्या साईराजच्या मृत्यूचं गूढ उकललं, समलिंगी संबंधाला विरोधातून नात्यातील तरुणाने संपवलं, आरोपीला बेडया…


शिरूर : दहिवडी (ता. शिरूर) परिसरातील मांजरेवस्ती येथे मंगळवारी (ता .१७) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास १२ वर्षीय मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर मुलाच्या हत्येमागील गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे.

साईराज गणेश मांजरे (वय १२, रा. मांजरेवस्ती, दहिवडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे.

मंगळवारी (ता. १७) सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास मांजरेवस्ती येथील विहिरीजवळील शेतात साईराजचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात साईराजच्या डोक्याच्या मागील बाजूस जखम असून पोटावर व शरीरावरही मारहाणीच्या खुणा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून रात्रभर शोधमोहीम राबवली.

समलैंगिक संबंधास नकार दिला म्हणून..

तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी नात्यातीलच २२ वर्षीय अक्षय नामक तरुणाला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासानुसार समलैंगिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपीने कोणाचाही संशय येऊ नये म्हणून घटनास्थळी जमलेल्या गर्दीत स्वतःला मिसळून घेतल्याचे समोर आले आहे. या कृतीमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला होता

पोलिसांनी वेगवान हालचाली करत काही तासांतच प्रकरणाचा उलगडा केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!