”आज माझं मन जड झालंय…आजचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित” ; मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्मारकाची घोषणा

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी मोठ्या घोषणा केल्या.”आज माझं मन जड झालंय,आजचा अर्थसंकल्प आपण अजितदादांना समर्पित करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अजितदादांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो, अशी घोषणा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हटले की, आज माझं जड झालंय आहे. आजचा अर्थसंकल्प आपण अजितदादांना समर्पित करत असल्याचे त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या प्रशासनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजित पवार व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळात स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख होती. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.