ब्रेकिंग! लोकसभा, विधानसभा एकत्र लढण्याची महाविकास आघाडीची घोषणा, भाजपच टेन्शन वाढलं…!
मुंबई : काही वर्षांपूर्वी राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केले होते. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
याबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक देखील झाली आहे. यावेळी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात भाजपसाठी मोठी कसरत असणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे.
याबाबत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते, अशी माहितीही राऊतांनी दिली. यामुळे आता जागावाटप आणि इतर गोष्टी देखील ठरवल्या जाणार आहेत.
यावेळी राऊत म्हणाले, सध्या राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवण्याचे काम राज्य करत असल्याचे संजय राऊत म्हणाले.