आम्हीच मुस्लिमांचे आरक्षण संपुष्टात आणले, अमित शहा यांचे मोठे वक्तव्य


 

बंगळूर : गुब्बी येथे भाजपच्या वतीने रोड शो करण्यात आला. यात केंद्रीय मंत्री अमित शहा सामील झाले होते. या शोनंतर अमित शहा यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

शहा म्हणाले, भाजप सरकारने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण संपुष्टात आणले आणि वोक्कलिंग, लिंगायत व एससी, एसटींचा कोटा वाढवला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकसाठी खूप मोठे काम करून ठेवले आहे.

भाजपने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण संपुष्टात आणले, तर वोक्कलिंग, लिंगायत, एससी, एसटींचा कोटा वाढवला. जर काँग्रेस सत्तेत आली तर ते हा कोटा कमी करतील आणि मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण पुन्हा लागू करतील, असेही ते म्हणाले.

तुम्हाला मुस्लिमांचे आरक्षण पुन्हा लागू केलेले चालणार आहे का? कर्नाटकमध्ये डबल इंजिनचे सरकार निवडून द्या, असे आवाहनही शहा यांनी केले. जर कर्नाटकमध्ये भाजप निवडून आला, तर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असेही शहा यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!