मित्रांनीच काढला मित्राचा काटा! कारण ऐकून सगळेच हादरले, नारायणगाव पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

जुन्नर : अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून मित्रांनींच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मौजे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे घडली आहे. २४ तासातच आरोपींना नारायणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे (वय ३१ वर्षे रा. अमरवाडी खोडद ता. जुन्नर जि. पुणे), देवराम विठठल कोकाटे (वय २७ वर्षे रा. कुंभारआळी खोडद ता. जुन्नर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावी आहेत. तर, साहेबराव नामदेव भुतांबरे (वय ४५ वर्षे रा. कोतूळ ता. अकोले जि. अहमदनगर सध्या रा. पाटखैरेमळा नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे ) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे गावचे हददीतील खोडदरोड येथील तेलओढयच्या वरील बाजूस पडिक जमिनीमध्ये एका अनोळखी व्यक्तीची अज्ञात कारणासाठी मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मृतदेहाची ओळख पटवून सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
त्यानंतर हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे फोटो नारायणगाव परिसरामध्ये सोशल मिडीयादवारे प्रसारित करून मृतदेहा ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. रात्री उशीरा फोटो पाहून मृतदेहाचे नातेवाईक यांनी ओळख पटविली. त्याचे नाव साहेबराव नामदेव भुतांबरे असल्याचे निष्पन्न झाले.
साहेबराव याची ओळख पटल्यानंतर त्याची नारायणगाव परिसरामध्ये माहिती घेतली असता , तो जेसीबी ड्रायव्हर असल्याचे समजले तसेच घटनेच्या रात्री साहेबराव याला दोन इसमांसोबत खोडदरोड च्या दिशेने जाताना पाहिले होते. त्यामुळे सदरच्या गुन्हयात त्याच्या सोबतच्या दोन व्यक्तींचा इसमांचा सहभाग असल्याचा संशय आल्याने लगेच त्यांचा शोध नारायणगाव परिसरामध्ये पोलिसांनी सुरू केला.
साहेबराव यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीची नावी प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे, देवराम विठठल कोकाटे असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे चौकशी पोलिसांनी सुरू केली. या चौकशीत सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांचेकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून केल्याचे निषन्न झाले. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे हे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षकअंकित गोयल . जिल्हा पुणे ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , पुणे विभाग, रविंद्र चौधर उपविभागिय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे, पोसई धुर्वे, पोसई धनवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई अभिजित सावंत, पोलीस हवालदार . दिपक साबळे, विक्रम तापकिर, राजु मोमीण, पोना संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, निलेश सुपेकर तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार. कोकणे, पो.ना.मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे, गोरक्ष हासे, संतोष साळुंके,योगेश गारगोटे, गोकुळ कोळी, गोविंद केंद्रे, अरविंद वैदय यांनी केली आहे.