संपत्तीच्या कारणावरून वहिनींच्या वडिलांचा खून, एक वर्षानंतर वरवंड येथील घटना उघडकीस…


यवत : आपल्या वहिनीला तिचे वडील मरणानंतर संपत्ती देणार नाहीत. असा राग मनात धरून वहिनींच्या वडिलांचा खून केल्याची घटना वरवंड (ता. दौंड) येथील परिसरात वर्षभरापूर्वी घडली या खुनाला आता वाचा फुटली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ४ जणांना गुन्हा दाखल केला आहे.

सुरेश नेमीचंद गांधी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर अतुल जगताप, प्रणव भंडारी, विजय मंडले, राकेश भंडारी (सर्व रा. वरंवड ता. दौड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कालीदास शिवदास शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर घटना ही २७ मार्च २०२२ रोजी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवंड येथील राकेश भंडारी,याने आपली वहिनी सपना राहुल भंडारी यांना त्यांचे वडील सुरेश नेमीचंद गांधी हे त्यांचे मृत्यू नंतर मालमत्तेमध्ये हक्क देणार नाही याचा राग मनात धरून आरोपी राकेश भंडारी व त्याच्या मित्रांनी सुरेश गांधी यांचा वरंवड हद्दीतील वन विभागाच्या जमीनीमध्ये गळा दाबुन खुन केला.

त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी ते घरामध्ये पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाले असा खोटा बनाव रचला. आणि अशी खोटी माहिती सर्व नातेवाईकांना सांगितली. व मृतदेहाचे शवविच्छेदन न करता अंत्यविधी केला.

परंतु एका वर्षांच्या नंतर हा खुनाचा प्रकार उघड आला. मंगळवारी रात्री या बाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये वरील चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरवंड येथील कालिदास शिवदास शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या तक्रार वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चार जणांवर खुन करणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!