महापालिका निवडणुकांचा धुरळा ; खासदाराचा लेक पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक, उमेदवारी मिळणार?


पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 128 जागांची आरक्षण सोडत घोषित झाल्याने सर्वच जागांच चित्र स्पष्ट झाल आहे. आपली उमेदवारी म्हणजे तिकीट फिक्स करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे.अशातच आता मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत. या निवडणुकीत त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे देण्यात आली आहे. आता आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत.जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रमुख नेत्यांवर महापालिका निवडणुकीसंबंधी प्रभारी, निरीक्षक आदी पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी बारणे यांच्यावर आहे. मात्र मुलाला उमेदवारी मिळवून देण्यासाठी बारणे प्रयत्नशील आहेत.

दरम्यान या निवडणुकीसाठी बारणे यांच्या सुपुत्राला तिकीट मिळाले तर संबंधित प्रभागात अनेक वर्षांपासून उमेदवारीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिवसैनिकांवर अन्याय होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत खासदार बारणे यांना प्रश्न विचारला असता, कुणावरही अन्याय होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष ताकदवान आहेत. राज्यातील सत्ताधारी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढतात की युती करतात, हे अजून स्पष्ट झालेले नसले तरीही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पिंपरीत राष्ट्रवादी-भाजप आणि सेना वेगवेगळे लढू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!