महापालिका निवडणुकीचा धुरळा; ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी, तब्बल ४०० जणांनी घेतली मशाल


मुंबई :राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकानंतर आता महापालिका निवडणुकांचा धुरळा उडाला आहे.मुंबईसह पुणे अन् राज्यातील २९ महापालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी लागली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत एकाचवेळी ४०० जणांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर ठाकरेंची ताकद वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडल असताना दुसरीकडे मात्र भांडुपमध्ये ४००हून अधिक कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या इनकमिंगमुळे ठाकरेंची शिवसेनेची ताकद वाढली आहे.

भांडुपमधील वॉर्ड क्रमांक ११५ मधील शिंदे गटातील माजी नगरसेवकाला टक्कर देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाला आहे. आमदार सुनील राऊत आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला आहे. भांडुपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.

मुंबई महापालिकेसाठी प्रचार अन् उमेदवाराच्या मुलाखती सुरू असताना ४०० जणांनी शिवसेनेची मशाल घेतली. त्यामुळे मुंबईत ठाकरेंची ताकद वाढली आहे. . मुंबई कोकणापासून संभाजीनगर ते नागपूर अन् उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं इनकमिंग सुरू झाले आहे.

       

भांडुपमधील ४०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी एकाचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटवली. भाजप, शिंदेंची शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकाचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!