मोठी बातमी! राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारी निकाल…

मुंबई : आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पुढील एक महिना याबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार, याबाबत सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर आता निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा आहे. 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाणनी होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत

आज (15 डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाने अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान 15 जानेवारी या तारखेला होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 या तारखेला केली जाईल.

निकालही याच दिवशी घोषित केला जाईल. निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना २३ डिसें ते ३० डिसेंबर 2025 या काळात अर्ज करता येतील. तर 2 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आयोग31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत अर्जांची छाननी करेल.
मुंबईत एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक आयोजित केली जाईल. या सर्व जागा जिंकण्यासाठी तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीशी फूट पडल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असे सांगितले आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मनसेसोबत युती करून ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
