मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण! प्रमुख आरोपी शितल तेजवानींचा तपासात सहकार्य करण्यास नकार?

पुणे: बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला 3 डिसेंबर रोजी पुण्यातून अटक केली आहे. मात्र पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा शितल तेजवानी हिने हायकोर्टात करत याचिका दाखल केली आहे.यावर आता तेजवानी हिला रितसर नोटीस बजावण्यात आली असतानाही तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील 40 एकर जमीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली आहे. याप्रकरणी त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र या अटकेवर आता शितल तेजवानी हिने याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीत शितल तेजवानी हिला अटक करताना कोणतीही नोटीस बजावली नाही.त्यामुळे कायद्याचं उल्लंघन झालं असा दावा केला. हा दावा पोलिसांनी फेटाळला असून न्यायालयांना सांगण्यात आलं कि, तपासात कोणतेही सहकार्य तिने केल नाही. याशिवाय तिने इतर प्रकरणात ही फसवणूक केली आहे. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला.

दरम्यान महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. आता या प्रकरणात चौकशीअंती आणखी काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.