मुंबईकरांनो, घराबाहेर पडताना पर्यायी मार्गाचा विचार करुनच बाहेर पडा; रविवारी होळीच्या दिवशी लोकलचा मेगा ब्लॉक


मुंबई : मुंबईकरांनो घराबाहेर पडताना पर्यायी मार्गाचा विचार करुनच बाहेर पडा. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी आणि देखभालीच्या विविध कामांसाठी उद्या रविवारी होळीच्या दिवशी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत आहे. तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल थांबतील. नंतर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

१५ मिनिटे उशिराने धावतील. ठाणे येथून सकाळी १०:५८ ते दुपारी ३:५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिरा
धावतील.

हार्बर मार्ग-
१) सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

२) डाउन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी १०:१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३:४४ वाजता सुटेल.

३) अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०:०५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:४५ वाजता
सुटेल.

पश्चिम रेल्वे :
पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव –
१) डाउन धिम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल टिटवाळा लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी ९:५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३:३२ वाजता सुटेल.

२) अप धिम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल आहे. ठाणे येथून ती सकाळी १०:२७ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल आहे. ठाणे येथून ती दुपारी ४:०३ वाजता सुटेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!