मुंबई हादरली! बोलणं बंद झाल्याच्या रागात तरुणाचं डोकं सटकलं अन् कोयत्याने मुलीच्या गळ्यावरच….


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच आता मुंबईतील मुलुंड परिसरात एका तरुणाने 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने सपासप वार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष बनसोड असं आरोपीचं नाव आहे. संबंधित पीडिता आणि आरोपी हे बदलापूरचे रहिवासी असून एकमेकांना ओळखतात. काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने आरोपीशी बोलणं बंद केलं होतं. याचा राग मनात धरत आरोपीने मुलुंडमध्ये तरुणीला कॉलेजजवळ तिला गाठलं आणि कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. तसेच तिच्या मित्रावर देखील हल्ला केला.

मुलुंड पोलिसानी आरोपीला कोयत्यासह अटक केली आहे. आरोपी आशिषवर बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास मुलुंड पोलीस करीत आहेत. घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!