Mumbai : घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई! राज्याचे अतिरीक्त डिजीपी कैसर खालिद निलंबित…

Mumbai : काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत १७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे.

खालिद यांच्या पत्नीच्या खात्यात होर्डिंगची परवानगी असलेल्या कंपनीने लाखो रुपये भरल्याचा आरोप आहे. यातून खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशात आयपीएस कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. Mumbai
ज्या कालावधीसाठी हा आदेश अंमलात राहील त्या कालावधीत, निर्वाह भत्ता, महागाई भत्ता आणि देय असलेले इतर भत्ते अदा केले जातील. यासाठी त्यांनी इतर कोणत्याही नोकरी, व्यवसाय किंवा व्यवसायात गुंतलेले नसल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले असले पाहिजे.

खालिद यांच्यावर मंजूर निकषांकडे दुर्लक्ष करून १२० ७ १४० चौरस फूट आकाराचे मोठे होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी देऊन आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असा आरोप ठेवण्यात आला आहे. डीजीपी कार्यालयाची परवानगी न घेता स्वत:हून होर्डिंग मंजूर केले. यामध्ये प्रशासकीय त्रुटी व अनियमितता आढळून आली आहे.