मुंबई हादरली! ग्राहकाने रायफलमधून गोळी झाडली अन डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत असतानाच आता मुंबईच्या परळ भागात एका डिलिव्हरी बॉयवर ग्राहकाने थेट गोळी झाडली आहे. या घटनेने संपूर्ण परळ हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश कॉटन इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या सौरभ कुमार याने शुक्रवारी संध्याकाळी एका ऑनलाइन मेडिकल अॅपद्वारे औषधे मागवली होती. डिलिव्हरी बॉय औषधे घेऊन त्यांच्या फ्लॅटच्या दारापर्यंत पोहोचला. त्याने बेल वाजवली, पण सौरभने दार उघडले नाही. डिलिव्हरी बॉयने वारंवार बेल वाजवल्याने संतापलेल्या सौरभने आपल्या एअर रायफलमधून हवेत गोळी झाडली. नशीबाने गोळी हवेतच गेली आणि कोणालाही दुखापत झाली नाही. डिलिव्हरी बॉयने तात्काळ आपला जीव वाचवला आणि

दरम्यान या घटनेची माहिती डिलिव्हरी बॉयने पोलिसांना दिली. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सौरभला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!