Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर दहा दिवस ब्लॉक, जाणून घ्या ‘असं’ असणार वाहतुकीचे नियोजन
Mumbai Pune Expressway पुणे : तुम्ही पुढील दहा दिवसांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुढील १० दिवस १२ ते १ दरम्यान, या मार्गावर यावेळेमध्ये वाहतूक ही बंद ठेवली जाणार आहे. Mumbai Pune Expressway
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुढील दहा दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. यशवंतरावर चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार आहे. १७,१९ आणि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेमध्ये द्रुतगतीमार्गावरील मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून माहिती देण्यात आली आहे.
यशंवतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर १७ ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगद्याजवळ ४७/९०० कि.मी आणि लोणावळा बोगद्याजवळ ५०/१०० येथे ग्रॅन्ट्रीचे काम सुरु करण्यात येणार आहे.
तर १८ ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी जवळ कि.मी. ४४/८०० आणि खालापूरजवळ कि.मी ३३/८०० ग्रॅन्ट्री उभारण्यात येईल. तसेच १९ ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. ३७/८००आणि कि.मी. ३७ जवळ ग्रॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. तर खोपोली एक्झीटजवळ कि.मी ३९/८०० वर ग्रॅन्टी उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.
या वेळत आणि या दिवशी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सरद वाहिनीवरील वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 1 नंतर ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे जर तुम्ही पुढील दहा दिवसांमध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार असाल तर यावेळेमध्ये प्रवास करणं टाळावं लागेल. अन्यथा तुमचा बराच वेळ या द्रुतगती मार्गावर खोळंबा होऊ शकतो.