Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज प्रवास करणारांसाठी महत्वाची बातमी! मार्गावर आज एक तासांचा ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग…


Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुपारी एक तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

आज (ता.२०) दुपारी १२ ते १ दरम्यान द्रुतगती मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज एक तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या लेनवर वाहतूक बंद राहील.

हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर १.५५ किमी अंतरावर ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. Mumbai Pune Expressway

या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर हलक्या वाहनांना कळंबोली येथून डाव्या बाजूला वळून कळंबोली सर्कलवरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून मार्गस्थ होता येईल.

तर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कळंबोली येथून डाव्या बाजूला वळून कळंबोली सर्कलवरून कळंबोली-डी-पॉइंट- करंजाडे – पळस्पे येथून पुढे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुढे मार्गस्थ होता येईल. त्याचबरोबर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कोन ब्रिजवरून वळवून द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!