Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक, सर्व वाहतूक राहणार बंद, जाणून घ्या…
Mumbai Pune Expressway : तुम्ही जर आज म्हणजेच १ फेब्रुवारीला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचूनच प्रवासाला निघा. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करणार असल्याने आज हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे पुलावरुन सर्व प्रकारची वाहने जुना मुंबई -पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. Mumbai Pune Expressway
तसेच जुना पुणे ते मुंबई मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. Pune Mumbai Express
दरम्यान, यापूर्वीही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेकदा असे ब्लॉक घेण्यात आले आहे. अनेकदा ब्लॉक घेऊन ही कामं करण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येकवेळी दोन तासांचाच ब्लॉक घेण्यात येतो. मात्र काम लवकरात लवकर संपवण्याकडे कल असतो. आतापर्यंत दोन तासांचा ब्लॉक घेऊन साधारण अर्ध्या किंवा एका तासात काम पूर्ण झालं आहे.