Mumbai News : आईस्क्रीम मध्ये आढळलेले बोट ना पुण्यातील ना इंदापूरातील, पोलिसांनी ही डेअरी केली सील, जाणून घ्या…


Mumbai News : मुंबईमध्ये महिलेला आईस्क्रीमच्या शंकूमध्ये मानवी विच्छेदन केलेले बोट सापडले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकणी मालाड भागात राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांना माहिती दिली आहे.

याकोन मध्ये आढळलेले बोट कोणाचं यावर आता देशाचे लक्ष लागले आहे. यम्मो कंपनीचे हे आईस्क्रीम होते. या कंपनीच्या हडपसर येथील मुख्यालयावर पोलिसांनी धाड घातली. त्यानंतर हे आईस्क्रीम बनविणाऱ्या दोन कंपन्या तपासाचे मुख्य लक्ष आहेत.

याचे कनेक्शन इंदापूर तालुक्यातही पोचले होते, मात्र आता हे आईस्क्रीम गाझियाबादच्या लक्ष्मी डेअरी मध्ये बनवले होते, हे समोर आले आहे, त्यामुळे इंदापुचे कनेक्शन याच्याशी अजिबात नाही हेही सिद्ध झाले आहे.Mumbai News

यम्मो कंपनीचे हे आईस्क्रीम तीन ठिकाणी बनते. हडपसर येथील एम्मो कंपनीचे मुख्यालय, गाजियाबाद दिल्ली येथील लक्ष्मी डेअरी आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर एमआयडीसी अशा तीन ठिकाणी हे आईस्क्रीम बनते. हडपसर पोलिसांनी एम्मो कंपनीच्या मुख्यालयावर धाड घातली. त्यानंतर हे आईस्क्रीम नक्की कुठे बनले याचा शोध पोलिसांनी सुरू केला आणि पोलीस गाझियाबाद पर्यंत पोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिथे या आइस्क्रीमचे उत्पादन केले होते, त्या फॅक्ट्रीमध्ये तपास सुरू आहे. पोलिसांनी गाझियाबादची फॅक्ट्री सील केली आहे. येथील आइस्क्रीम पॅक करण्यात आले होते.

आइस्क्रीमच्या रॅपरवर याची निर्मिती ११ मे २०२४ आणि वैधता कालावधी १० मे २०२५ पर्यंत नमूद करण्यात आली होती. हे आइस्क्रीम गाझियाबादच्या लक्ष्मी डेअरी आइस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेडकडून बनवण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!