Mumbai News : गर्लफ्रेंडने शॉपिंगसाठी १ लाख मागितले; टेंन्शनमध्ये तरुणाने अस काही केलं की सगळेच हादरले…
Mumbai News : मुंबईमधून एक डोके चक्रवणारी घटना समोर आली प्रेयसीने शॉपिंगसाठी १ लाख रुपये मागितल्याने हे. बॉयफ्रेंडने आत्महत्या केली मुंबईच्या पवई परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रथम असे २० वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवई पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या या तरुणाने १ नोव्हेंबर रोजी आपले जीवन संपवले. आपल्या मुलाने अचानक एवढे टोकाचं पाऊल का उचललं या विचाराने त्याचे आई वडील त्रस्त होते. Mumbai News
प्रथम याच्या निधनाने त्याचा वडिलांवर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशात मुलाच्या मित्राने आता त्याच्या आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे. प्रथमच्या मित्राने त्याच्या वडिलांची भेट घेतली. तसेच प्रथामच्या गर्लफ्रेंडबाबत सांगितले. तरुणी प्रथमला सतत त्रास देत होती.
तिने त्याच्याकडे शॉपिंगसाठी १ लाख रुपये मागितले होते. एव्हढी मोठी रक्कम कुठून आणायची यामुळे तो चिंतेत होता. पैसे न दिल्याने ती त्याला सतत त्रास द्यायची. त्यामुळे त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असे मित्राने सांगितले.
तसेच वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात प्रथमचा फोन तपासला.
दरम्यान, त्यावेळी यात त्या दोघांची चॅट पोलिसांना सापडली. त्यामुळे मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.