Mumbai News : मुंबईत सणासुदीच्या काळात दार खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना, नेमकं घडलय काय?
Mumbai News : दिवाळी काही दिवसांवर आली असताना मुंबईत वेगळेच संकट निर्माण झाले आहे. मुंबईत हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषणाचा एक्यआय ३०० पेक्षा जास्त झाला आहे. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी आहे. मुंबईतील वाढलेल्या प्रदूषणामुळे दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध आणले आहे. तसेच आता मॉर्निंग वॉकला जाण्यास बंदी केली गेली आहे.
मास्कचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. मुंबईतील प्रदूषण वाढल्यामुळे मुंबईची तुलना दिल्लीशी होऊ लागली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसन विकाराचे रुग्ण वाढले असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मुंबईत दृश्यमानता सकाळी ११ पर्यंत चांगली होत नाही. यामुळे सकाळी जास्त अंतरावरील वस्तू, वाहन दिसत नाही. Mumbai News
मुंबईतील प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं आता मुंबईकरांच्या दैनंदिनय व्यवहारांवर निर्बंध येताना दिसत आहेत. परिणामी आता या प्रदूषणामुळं नागरिकांना भलत्याच लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे.
सध्या शहरातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेत मॉर्निंग वॉक, संध्याकाळचा फेरफटका, व्यायाम , धावण्याची सवय अशा गोष्टी न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर, सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी घराची दारं- खिडक्या बंद ठेवण्यासंबधीच्या सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय शहरातील प्रदूषणाचा अभ्यास करत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या निकषांची आखणी करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्याचेही निर्देश राज्यातील आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.