Mumbai News : ३० रूपयांचा वाद जीवावर बेतला, मित्रानेच केली मित्राची हत्या, घटनेने राज्यात खळबळ…

Mumbai News : मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केला असता त्यांना तरूणानेच त्याच्या मित्राची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईतील कुर्ला येथे अवघ्या ३० रुपयांसाठी मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑटोरिक्षाचे भाडे देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला, जो इतका वाढला की एकाने दुसऱ्याचा जीवही घेतला.
पोलिसांनी सांगितले की, मुंबईतील कुर्ला परिसरातील पॅलेस रेसिडेन्सी बारच्या बाहेर एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर कुर्ला पोलिसांनी घटनास्थळ गाठून या तरुणाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.

तो मृतदेह २९ वर्षीय चक्कन अली नावाच्या व्यक्तीचा होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, त्यांना चक्कन अलीची हत्या त्याच्या मित्रानेच केली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने आरोपीला अटक केली. कुर्ल्यातील पॅलेस रेसिडेन्सी बार बाहेर पोलिसांनी आरोपी सैफ जहिद अली याला बेड्या ठोकल्या. Mumbai News
दरम्यान, कुर्ला पोलिसांनी केलेल्या तपासात सैफ आणि छक्कन हे मित्र असल्याचे उघड झाले असून, ते सात दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोंडा येथून मुंबईत आले होते. हे दोघेही धारावीतील एका कपड्याच्या कारखान्यात शिवणकामाचे काम करायचे.
रविवारी रात्री दारूच्या नशेत दोघेही धारावी ९० फूट रोडवरून एलबीएस रोडवरील पॅलेस रेसिडेन्सी बारकडे रिक्षा घेऊन गेले.३० रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून सैफ आणि छक्कन यांच्यात वाद झाला, यादरम्यान सैफने छक्कनला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि ढकलले, यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.