Mumbai News : मराठा समाजातील २१ मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर, शासनाचा महत्वपूर्ण निर्णय…


Mumbai News : मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे. त्यानुसार २१ विद्यार्थ्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्तींतर्गत विदेशात उच्च शिक्षणासाठी साह्य करण्यात येणार आहे.

ही शिष्यवृत्ती काही अटींवर देण्यात येणार आहे. ही योजना २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पी. एच. डी. अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ५० व २५ याप्रमाणे एकूण ७५ लाभार्थ्यांची निवड करणे अपेक्षित असल्याचे राज्य सरकारच्या नियोजन विभागाने सोमवारी जारी केलेल्या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे. Mumbai News

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांत शिक्षणासाठी राज्य सरकारने शिष्यवृत्ती योजना घोषित केली होती.

छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) ‘सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ या योजनेंतर्गत एकूण २१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यात पीएच.डी.साठी तिघांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे; तर पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. Mumbai News

यामध्ये पी. एच. डी. अभ्यासक्रमासाठी प्रीती शिंदे या विद्यार्थिनीस दक्षिण कोरियातील विद्यापीठात केमिकल इंजिनिअरींगसाठी, पल्लवी अरुण मोहनापुरे या विद्यार्थिनीस बेल्जियमच्या विद्यापीठात अॅग्रीकल्चरल सायन्ससाठी तर, प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यास ऑस्ट्रियातील विद्यापीठात मटेरिअल सायन्समध्ये पी. एच. डी. करण्यासाठी विदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी १८ मुलामुलींना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. यात मनीषा कदम, निकिता जरे, योगिता पाटील, अथर्व बिरादर, अनिरुद्ध शिंगटे, आशीष ठाकरे, विजय वारे, यश अशोक नवघरे, कौस्तुभ खोडके, गौरव पाटील, राहुल औताडे, सिद्धार्थ काकडे, सतीश गायकवाड, आर्चिस टाकळकर, वेद साळवी, रितप्रभा सूर्यवंशी, शिवराज आखरे आणि क्षितिज देवखिले यांचा समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!