Mumbai Hit And Run : हिट अँड रनचा थरार!!! बीएमडब्ल्यू कारने दोघांना चिरडले, गणपतीचे बॅनर लावणाऱ्या एकाचा मृत्यू, एक जखमी….


Mumbai Hit And Run : हिट अँड रनच्या घटनेनं पुन्हा एकदा मुंबई हादरली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटेच्या सुमारास मुलुंडमध्ये एका आलीशान कारनं दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघे तरुण गणेशोत्सव मंडळाचे बॅनर रस्त्यावर लावत होते. बॅनर लावत असतानाच दोघांना कारनं जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पण, मुंबईत पहाटे घडलल्या घटनेनं मात्र शोककळा पसरली आहे. मुंलुंडमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे हिट अँड रनची घटना घडल्यामुळे संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. या घटनेत गणेशोत्सव मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. कार्यकर्त्यांना उडवल्यानंतर चालक तिथून पसार झाल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे.

मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती.

यादोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!