Mumabi News : सिद्धिविनायक मंदिर अध्यक्षपदावरून आदेश बांदेकर यांना हटवले, आता अध्यक्षपदी शिंदे गटातील आमदाराची नियुक्ती…
Mumabi News : शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना आता मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना मोठा धक्का देण्यात आला आहे.
देशावर, राज्यावर वा मुंबईवर आलेल्या अनेक संकटांच्या काळात मंदिराने सढळ हाताने मदतीचा हात पुढे केला होता. पण आता याच आदेश बांदेकर यांना मोठा धक्का बसलाय. माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. Mumabi News
महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आदेश बांदेकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. १९ वर्षे ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले.
दरम्यान, शिवसेनेच्या प्रचारात ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. शिवतीर्थावरील दसरा मेळावा ते उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभा, त्याचे सूत्रसंचालन बांदेकरांकडेच असतं. यामुळे त्यांना 2017 मध्ये शिवसेनेच्या कोट्यातून त्यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासावर वर्णी लागली होती.
नंतर २०२० ला पुन्हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची पुनर्नियुक्ती केली होती. आता मात्र शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता हे पद एकनाथ शिंदे यांच्या आमदाराकडे गेले आहे. तर बांदेकर हे ठाकरे यांच्याकडे आहेत.