मुळशीच्या भोंदूबाबाचे कारनामे उघड! मृत्यू टाळण्यासाठी गर्लफ्रेंड, वेश्येसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला अन्….

पुणे : पुण्यातील भोंदूबाबा प्रसाद तामदार याचे हायटेक कारनाम्यांनी श्रद्धेचा बाजार मांडला आहे. श्रद्धेच्या आडून भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या या बाबाचे पितळ उघडे पडले आहे.

मोबाईलमधील हिडन ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवून मोबाईल कॅमेरातून खाजगी क्षण पाहायचा. या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध एका ३९ वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार या भोंदू बाबाने त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले.

दरम्यान, एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे.
फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबाने अशीच अनेकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पोलिस तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तुमचा मृत्यू अटळ आहे, असं सांगून त्यावर उपाय म्हणून प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा, असा सल्ला बाबाने काही भक्तांना दिला असल्याचं तपासात समोर आलं आहे.
विशेष म्हणजे, शरीरसंबंध सुरू असताना या भोंदू बाबाने मोबाइल दिशादर्शक (नेव्हिगेशन) सुरू करून तो मोबाइल एखाद्या विशिष्ट कोनात ठेवण्यास सांगत होता. त्याद्वारे मोबाइल कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा भोंदू बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत होता.
दरम्यान, एका भक्ताचा मोबाइल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी मित्राकडे दिला असता या मोबाइलमध्ये हिडन ॲप सापडले. यानंतर बाबाचा भांडाफोड होऊन गुन्हा दाखल करण्यात आला.