नाशिकमध्ये मुळशी पॅटर्न!! सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून सपासप वार करत संपवलं..

नाशिक : याठिकाणी गुन्हेगारीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे तडीपार सराईत गुंड भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर याची गावातीलच 14 जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रवीण कांदळकर हा दोन वर्षांच्या तडीपारीची शिक्षा भोगून घरी आला होता. शहा गावातीलच गोराणे नावाच्या कुटुंबीयांशी त्याचे भैरवनाथाच्या यात्रेत वाद झाले होते. यामुळे वाद सतत पुढे येत होता. शनिवारी सकाळी गुन्हेगार त्याच्या घरात प्रवेश करून त्याला मारहाण करू लागले. कांदळकरला जबर मारहाण केली.
त्यानंतर त्याला बाहेर ओढून आणत अंगणात टाकून देत पळ काढला. यामध्ये त्याला मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो मृत्युमुखी पडला. याप्रकरणी त्याची आई विजया कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 14 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. या प्रकरणी सौरभ गोराणे, दिनेश गोराणे, वाळीबा गोराणे, शरद गोराणे, विजय गोराणे, सचिन बागल, राहुल बागल, अतुल गोराणे, आबा गोराणे, रवींद्र गोराणे, वैभव गोराणे, दगू साप्ते (पाहुणा अस्तगावकर), गणेश सोनवणे, सर्जेराव गोराणे (सर्वजण रा. शहा ता. सिन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार असताना भैय्या कांदळकर गावात येऊन अनेक गुन्हे करत होता. परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. दोन वर्षांपूर्वी तडीपार असताना तो गावात आला होता. वावी, मुसळगाव आणि सिन्नर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शहा येथील घराभोवती सापळा रचला होता. यावेळी त्याने पोलिसांवर बंदूक रोखली होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.