Mukhtar Ansari Dies : मोठी बातमी! उत्तर प्रदेशचा कुख्यात माफिया मुक्तार अन्सारींचा करागृहात ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू..!!
Mukhtar Ansari Dies : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू झालाय. ह्रदयविकाराच्या झटक्याने अन्सारीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बांदा तुरुंगात बंदिस्त असलेल्या मुख्तार अन्सारी याची प्रकृती खालावल्याने त्याला बांदा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करताच अन्सारीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सारी याला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तो बेशुद्ध झाला. यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
९ डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते मात्र उपचारादरम्यान मुख्तार अन्सारी याचा मृत्यू झाला. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. Mukhtar Ansari Dies
दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी मुख्तार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया X वर लिहिले, यूपीचे माजी आमदार श्री मुख्तार अन्सारी यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. दिवंगत आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.