नववर्षाच्या निमित्ताने मुकेश अंबांनींची जिओ युजर्ससाठी मोठी भेट, तब्बल २०० दिवसांसाठी….


मुंबई : जिओ कंपनीचं सीम कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओकडून युजर्सला नवीन वर्षाचं शानदार गिफ्ट देण्यात आलं आहे. जर तुम्हीदेखील जिओ युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने युजर्सला शानदार भेट दिली आहे. याअंतर्गत जिओ युजर्सला २१५० रुपयांचा फायदा मिळणार आहे. ही ऑफर जिओच्या २०२५ रुपयांच्या प्लॅनसह येत आहे. यामध्ये युजर्सला वेगवेगळे फायदे मिळणार आहेत.

रिलायन्स जिओच्या 2025 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. या प्लॅनची ​​वैधता २०० दिवसांची आहे. याशिवाय युजर्सना प्रवास आणि फूड कूपन डिस्काउंट व्हाऊचर देखील दिले जातील.

हा प्लॅन खरेदी केल्यावर, तुम्हाला Reliance Jio कडून EasemyTrip व्हाउचर मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही फ्लाइट तिकीट बुकिंगवर १५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

याशिवाय, Ajio वर 2999 रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला ५०० रुपयांची सूट मिळेल. तुम्हाला Swiggy कडून १५० रुपयांचे व्हाउचर देखील मिळेल, ज्याद्वारे तुम्ही Swiggy वर डिलिव्हरी दरम्यान १५० रुपयांची सूट मिळवू शकता.

दरम्यान,ही ऑफर ११ जानेवारी २०२५ पर्यंत वैध असेल. याचा अर्थ तुम्ही ११ जानेवारीपर्यंत २०२५ रुपयांचा रिचार्ज केल्यास. त्यामुळे तुम्हाला २१५० रुपयांचा फायदा मिळेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!