MSRD : अनिल गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड…


MSRD : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे याठिकाणी नवीन व्यक्ती आता कामकाज बघणार आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरून हटवण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरुन हटवले आहे. मोपलवार हे राज्यात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोपलवार यांना दावरुन हटवले आहे. MSRD

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी मंडळाच्या प्रमुखपदाची सूत्रे आता राधेश्याम मोपलवार यांच्याकडून अनिल गायकवाड यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे मुख्यंमंत्रीपदाच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते. मंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी २०१८ मधील निवृत्ती नंतरही रेकॉर्ड ब्रेक सात वेळा आपली कालमर्यादा वाढवून घेतली होती.

राधेश्याम मोपलवार यांची २०१८ मध्ये निवृत्ती जाहीर झाली होती. मात्र, त्यानंतर मोपलवार यांना तब्बल सात वेळा आपली कालमर्यादा वाढवून मिळाली होती. मोपलवार हे मूळचे नांदेडचे असून, ते १९९५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. राधेश्याम मोपलवार यांची प्रशासकीय सेवा ही एक वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत राहिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!