धोनी समर्थकांसाठी मोठा धक्का!! एम एस धोनी आयपीएलमधून बाहेर, दुखापतीमुळे काही दिवस खेळता येणार नाही


मुंबई : आयपीएल 2026 ला आजपासून सुरुवात होत असून हा स्पर्धेचा 19वा हंगाम आहे. मात्र स्पर्धा सुरू होत असतानाच चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महेंद्र सिंह धोनी, जो दरवर्षी आयपीएलमधील प्रमुख आकर्षण ठरतो, तो यंदाच्या हंगामातील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही.

दुखापतीमुळे धोनीला किमान दोन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. धोनी हा चेन्नई सुपर किंग्स चा माजी कर्णधार असून संघाचा कणा मानला जातो. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये CSK ला धोनीशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने आज (28 मार्च) अधिकृत निवेदन जारी करत धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. या घडामोडीमुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून CSK च्या कामगिरीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नई सुपर किंग्स कडून सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र सिंह धोनी सध्या स्ट्रेनच्या दुखापतीचा सामना करत आहे. तो सध्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत असून, त्यामुळे आयपीएल 2026 च्या सुरुवातीचे दोन आठवडे त्याला मैदानाबाहेर राहावे लागणार आहे.

धोनीची ही दुखापत CSK आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. कारण तो केवळ एक-दोन सामनेच नव्हे, तर पुढील दोन आठवडे संघासाठी उपलब्ध नसणार आहे, ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे.

महेंद्र सिंह धोनी दोन आठवडे (सुमारे 14 दिवस) बाहेर राहणार असल्याने तो किमान तीन सामने गमावू शकतो. चेन्नई सुपर किंग्स चा पहिला सामना 30 मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

त्यानंतर 3 एप्रिलला चेन्नईत पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळला जाईल. पुढे 5 एप्रिलला CSK आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मैदानात उतरणार आहे. या तिन्ही सामन्यांना धोनी मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!