MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आयोगाकडून २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय…
MPSC : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आले आहे.
एमपीएससची २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससी आणि आबीपीएस या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत्या. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. या पैकी एक परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. MPSC
दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.