MPSC PSI Result : एमपीएससीत पुण्याचा डंका! जिल्ह्यातील अजय कळसकर आणि मयुरी सावंत राज्यात प्रथम…
MPSC PSI Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट या परीक्षेतील फौजदार पदाचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अजय कळसकर याने मुलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला तर मयुरी सावंत हिने मुलींमध्ये बाजी मारली.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेचा (२०२१) हा निकाल असून आयोगाच्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. खेळाडू प्रवर्गातील निकाल वगळून हा निकाल प्रसिद्ध करण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
२०२१ मधील ह्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. सहा जुलै आणि १७ जुलै २०२२ रोजी ही परीक्षा घेतली होती त्याचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची अनेक जण प्रतीक्षा होती. ३५८ जागांसाठी ही परीक्षा झाली होती यामध्ये अजय कळसकर यांना ३२९.५०% गुण मिळाले. MPSC PSI Result
दरम्यान, या निकालासह प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराची गुण देखील आयोगाने त्यांच्या संकेतस्थळात प्रसिद्ध केले आहेत. अर्थात काही उमेदवारांसंदर्भात तक्रारी आल्याने पुनर्पडताळणी करण्याच्या अटीच्या अधीन राहून या खेळाडू उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.